लातूर : लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील १० साखर कारखान्यांकडून चालू गळीत हंगामात २४ जानेवारीपर्यंत ३० लाख ६८ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करण्यात आले आहे. कारखान्याने २९ लाख ४५ हजार ९७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. दैनंदीन ४० ते ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे.
मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, राज्यात मांजरा साखर परिवाराने गाळपात भरारी घेतली आहे. चालू गाळप हंगामात २३ जानेवारी अखेर परिवारातील मांजरा साखर कारखान्याने ३ लाख ७१ हजार ८७० मेट्रिक टन गाळप केले आहे. निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याने ३ लाख ६५ हजार ४०० टन, तोंडार येथील विलास साखर कारखान्याने २ लाख ९१ हजार ३० टन, निवाडा येथील रेणा साखर कारखान्याने ३ लाख ९ हजार ७९०, तळेगावच्या जागृती शुगरने ३ लाख ६९ हजार ८१०, मळवटीच्या ट्वेण्टीवन शुगरने ३,२६,७२६, सोनपेठ येथील ट्वेंटीवन शुगरने ५,०२,५८०, लोहा येथील ट्वेंटीवन शुगरने १,४२,४८६, बेलकुंडाच्या मारुती महाराज साखर कारखान्याने १ लाख २२ हजार २४५ तर मंगरूळच्या मांजरा शुगर या कारखान्याने २ लाख ६६ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.