पुणे : यावर्षीच्या गाळप हंगामात आतापर्यंत श्री छत्रपती कारखान्याने चार लाख ७९ हजार २७५ मे टन उसाचे गाळप करून चार लाख ९२ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याला सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के मिळाला आहे. यावर्षी आतापर्यंत कारखान्याने ९३ दिवस गाळप केले आहे. कारखान्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कारखान्याचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे..
कारखान्याने प्रतिटन उसाला तीन हजार रुपयांची उचल दिली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन साडेसहा हजार मे. टन आहे. हंगामात कारखान्याने सभासदांच्या तीन लाख २३ हजार ३७७ मे टन उसाचे गाळप केले आहे. तर बिगर सभासदांच्या (गेट केन) एक लाख ५५ हजार ८९८ मे टन उसाचे गाळप केले. आतापर्यंत गाळप केलेल्या उसावर कारखान्याला साखर उतारा ११.२४ टक्के मिळाला आहे. कारखान्याला सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के मिळाला आहे. तर कारखान्याने १ कोटी ४९ लाख ५ हजार युनिट्स वीज निर्मिती केली आहे. साखर उतारा वाढवण्यासाठी ८६०३२ या उसाच्या गाळपाला प्राधान्य देण्यात येत आहे असे सांगण्यात आले.