सांगली : डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या निनाईदेवी युनिटने चालू हंगामात १२२ दिवसांत ५ लाख चार हजार ७३२ मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. कारखान्याने आतापर्यंत ६,१०८५० पोती साखर उत्पादित केली आहे. कारखान्याने १५ फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. याशिवाय, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांची बिले देखील त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी दिली.
युनिट हेड कुंभार म्हणाले की, चालू गळीत हंगामात डालमिया शुगर युनिट निनाईदेवी १२२ दिवसांत ५ लाख चार हजार ७३२ गाळप केले आहे. प्रती दिन १३.०३ टक्के साखर उतारा असून ६ लाख दहा हजार आठशे पन्नास साखर उत्पादित झाली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांत विश्वासार्हता निर्माण केली आहे. कारखान्याच्यावतीने राबविण्या आलेल्या ऊस विकास योजना उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.