हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
को ८६०३२, को २६५ ला उत्तम पर्याय म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधन करून को-९०५७ या नवीन ऊस वाणाची निर्मिती केली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये को ८६०३२ आणि को २६५ या ऊसाच्या वाणाची मक्तेदारी आहे; पण पावसाच्या असमतोल पणामुळे या वाणांच्या ऊसाचे तग धरणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचे खूप नुकसान होते. ते भरून काढण्यासाठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधन करून को-९०५७ या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे आणि उत्पादन वाढवणारे वाण असा प्रसार कृषी विभागामार्फत केला जात आहे. येत्या हंगामात बेणेमळयाच्या माध्यमातून निवड केलेल्या तीन कारखान्यांमार्फत मार्फत याचा पुरवठा केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये को ८६०३२, को २६५, को ९२००५ हे वाणच जास्त लोकप्रिय आहेत; पण गेल्यावर्षी पावसाने ओढ दिली, सलग अडीच महिने पाऊस आणि दाट धुके यामुळे या ऊसाच्या पानांवरती तांबेरा रोग पडला. यामुळे उसाच्या उत्पादनात निम्म्या पेक्षा जास्त घट झाली. सध्या उसाचे क्षेत्र वाढवण्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे उपलब्ध क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यावाचून पर्याय नाही.
को ८६०३२ हे वाण २३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९६ साली प्रसारित केले गेले. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले आणि सुपरसिद्ध असे हे वाण गेल्या बदलत्या वातावरणासमोर तग धरू शकत नाही आहे याचा परिणाम उत्पादनावरती होत आहे. यासाठी नव्याने आलेले ९०५७ हे वाण त्याची जागा घेऊ शकते.
९०५७ हे वाण जितके कमी पाण्याचा ताण सहन करते तितकेच अतिपाऊस व धुक्यातही चांगल्या प्रकारे टिकून राहते. आणि विशेष म्हणजे तांबेऱ्यासारख्या रोगाला ते फार कमी प्रमाणात बळी पडते.
ऊस नविन व्हरायटी माहिती वाचली समाधान वाटले पण ही व्हरायटी शेतकऱ्यांना कधी मिळणार आता थोडे सॅपल बियाणे मिळेल का