जकराया साखर कारखान्याकडून पोटॅश खताची निर्मिती: जाधव

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरु केली आहे. असा प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिलाच साखर कारखाना असल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी.जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याने विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याची माहिती जाधव यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खत निर्मिती प्रकल्प सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या विपणन विभागाचे मुख्य व्यवस्थापक विलास पाटील, दीपक कुंजीर, कैलास घोलप, आशिष उमप यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here