साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचे आश्वासन

फारुखाबाद : कायमगंज साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सरकारी ऊस विकास समित्या तसेच सहकारी साखर कारखाना समित्यांचे भागधारक असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. त्यावेळी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात आले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कार्यक्रमाला उपस्थित खासदार मुकेश राजपूत यांनी सांगितले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत आहेत. सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी चांगले बियाणे, तंत्रज्ञानाचा वापर करावा, तरच चांगला फायदा मिळू शकेल. आमदार डॉ. सुरभी यांनी शेतकऱ्यांना कायमगंज साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येईल असे आश्वस्त केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय कुमार सिंह यांच्यासह साखर कारखान्याचे सरव्यवस्थापकही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here