लखनऊ, उत्तर प्रदेश: समाजवादी पार्टी (सपा) चे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर ऊस शेतकर्यांना दिलेले अश्वासन तोडल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी उत्तर प्रदेशातील ऊस शेतकर्यांना मोठी वचने दिली होती, ज्यामध्ये 14 दिवसांच्या आत पूर्ण ऊस थकबाकी दिली जाईल, असे अश्वासनही दिले होते. पण उत्तर प्रदेशातील परिस्थिती अशी आहे की, आगामी हंगाम आता काहीच दिवसात सुरु होईल, आणि शेतकर्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत.
शेतकर्यांनी सांगितले की, ऊस थकबाकी न मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती नाजुक झाली आहे. सरकारनेही प्रशासनाला आदेश दिले आहेत की, थकबाकी न भागवणार्या साखर कारखान्यांवर कारवाई केली जावी. साखर कारखान्यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब आहे आणि तसेच साखरेची विक्री न झाल्याने राजस्व संग्रह करु शकत नाहीत आणि ज्यामुळे ऊसाचे पैसे भागवण्यात विलंब होत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.