शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सुयोग्य प्रयत्न, मनोहल लाल खट्टर यांचा दावा

शेतकरी आंदोलनानंतर हरियाणा सरकारने शेती क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या समस्यांना प्राधान्य दिले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी हरेक प्रयत्न केले जातील. यासोबतच दुधातील भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. हरियाणा सरकारकडून भिवानी येथे पशू प्रदर्शनाचे आयोजन केले होते. पशु पालन आणि मत्स्य पालन यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जनावरांसाठीच्या औषधांचे बजेट दुप्पट करू. सरकारी दवाखान्यात जादा औषधे उपलब्ध करून दिली जातील. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

याबाबत एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले, गेल्या हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. या प्रकरणात लवकरच नवे आदेश जारी केले जातील. २०२० मध्ये झालेल्या कापसाच्या नुकसानीबाबतही भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मदत दिली जात असल्याचा दावा सरकारने केला. दरम्यान, शेतकऱ्यांनी पिकांच्या किमान खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here