घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी सव्वातीनशे कोटींचा प्रस्ताव : आमदार कटके

पुणे : शिरूर तालुक्यातील बंद पडलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सव्वातीनशे कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी दिली. शिरूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचेही आ. कटके यांनी सांगितले.

आमदार कटके यांनी सांगितले की, साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी घोड धरणातून एक थेंबही पाणी देणार नाही. पक्षाचे शहराध्यक्ष शरद कालेवार, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, घोडगंगा कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, माजी जि. प. सदस्य राहुल पाचर्णे, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे, भाजप महिला शहराध्यक्ष प्रिया बिरादार, सुजाता पाटील, रंजन झांबरे, सुनिल जाधव, स्वप्निल रेड्डी, महेंद्र सातव, अनिल बांडे, जयवंत साळुंके, हर्षद ओस्तवाल आदींसह सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here