पाकिस्तानमध्ये करमुक्त साखर आयातीचा प्रस्ताव

इस्लामाबाद : देशातील साखरेच्या दरातील घोटाळे थांबवण्यासाठी सरकारने साखर आयातीवरील कर हटवावी असा प्रस्ताव ऊर्जा मंत्री हम्माद अजहर यांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत ऊर्जा मंत्री हम्माद अजहर यांनी चर्चेमध्ये साखर उद्योगातील विनियमन आणि उत्पादकांकडून कथित रित्या तयार केलेल्या कार्टेलबाबत सांगितले होते.

त्यांनी सांगितले की, सरकारकडून जाहीर करण्यात आलेला उसाचा किमान दर पाकिस्तानमध्ये करमुक्त साखर आयातीचा प्रस्ताव केवळ सांकेतिक होता. आणि साखर कारखाने नेहमी किमान दरापेक्षा अधिक दराने शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करत होते. या क्षेत्रातील नियमनामुळे गैरमार्ग तयार झाले आहेत. सरकारने बाजारातील प्रक्रियेला ऊस आणि साखरेचे दर निश्चित करुन देण्याची गरज आहे.

साखरेच्या किमतींमध्ये दीर्घकालीन स्थिरतेसाठी, सध्याचे साखर धोरण आणि उत्पादन खर्च यांचा आढावा घेण्यासाठी उद्योग आणि उत्पादन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या समितीने आतापर्यंत सात बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या शिफारशींचा समावेश अहवालात करण्यात आला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here