KMSC कडून साखर कारखान्याविरोधात २३ जानेवारी रोजी आंदोलन

अमृतसर : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून जीरा वाईन फॅक्टरी बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या (KMSC) रडारवर काँग्रेसचे आमदार राणा गुरजीत सिंह यांचा लौहका राणा साखर कारखाना आला आहे. केएमएससीने २३ जानेवारी रोजी कारखान्यासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

याबाबत ट्रिब्युन इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, KMSC चे नेते हरप्रीत सिंह यांनी सांगितले की. केएमएससीचे कार्यकर्ते २३ रोजी विभागात एक मोर्चाचे आयोजन करणार आहेत. ते म्हणाले की, कारखान्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. प्रदूषण वाढत आहे. आणि कार्यक्षेत्रातील जमिनीतील पाण्याचे प्रदूषण होत आहे. ते म्हणाले की, कारखान्याने रसायन उघड्यावर सोडले आहे असे सांगण्यात येत आहे. केएमएससीचे नेते हरप्रीत सिंह यांनी सांगितले की, विहिरी, विंधन विहिरींतील पाणी दूषित होत असल्याबाबत विभागातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. केएमएससीच्या इतर नेत्यांनी यावेळी विविध मुद्दे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here