आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या थकबाकी साठी आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

सरकारमध्ये आणि विरोधकांमध्ये साखर सम्राट बसले आहेत. गेल्या तीन चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. कारखानदार दोन्ही पार्टीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही. शेतकऱ्यांचे व्याजासहित पैसे देण्यात यावे. ते नाही झालं तर कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.” अशी भूमिका घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून ताबा आंदोलन करण्याक आले. आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुल इमारतीमध्ये घुसून घोषणाबाजी केली. पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ‘ताबा आंदोलन’ केला. राज्यातील अनेक शेतकऱ्याचे उसाचे थकीत एफआरपी रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली.

“थकीत एफआरपी देण्याची अंतिम तारीख उद्या आयुक्त सांगणार आहेत. शेतकऱ्यांचे पैसे देण्याची आमची मागणी आहे. शेतकऱ्यांचे पैसे द्या, नाहीतर कारखानदारांची संपत्ती जप्त करा. सहकारमंत्र्यांच्याच कारखान्याचा एफआरपी थकीत आहे.” अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी साखर आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर बाहेर येऊन प्रसार माध्यमांना दिली.

वजनकाट्या बाबत हि आमदार बच्चू कडू यांनी मुद्दा उपस्थित केला त्या बद्दल ते असे म्हणाले की “अनेक कारखान्यांमध्ये काटेमारी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे पर्यायी काटा सरकारने उपलब्ध करु दिला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here