कोल्हापूर, ता. 16 : गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी वरील पंधरा टक्के प्रमाने व्याजाची रक्कम मिळावी यासाठी जय शिवराय किसान संघटना, आंदोलन अंकुश व बळीराजा संघटना यांचे वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात केलेल्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर येथे कारखानदारांनी चौदा दिवसात रक्कम न दिल्यास नियमानुसार 15 टक्के व्याज द्यावे लागते. या व्याजाची रक्कम कारखानदार मुद्दामून कळवत नव्हते. यासाठी तिन्ही संघटनेच्यावतीने साखर आयुक्त पुणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता व यासाठी जर रक्कम कळवले नाही, तर पंधरवड्याच्या रिपोर्ट नुसार व्याज आकारावे व त्याची कारवाई करावी अशी मागणी केली होती ,यानुसार आज कोल्हापूर विभागातील कारखानदारांकडून 98 कोटीची थकित एफ आर पी ची रक्कम साखर आयुक्तालय पुणे येथे पाठवणे संदर्भात साखर संचालक कोल्हापूर यांना भाग पाडले, यामुळे येत्या एक महिन्यात ते दीड महिन्यात सर्व शेतकऱ्यांना थकित एफ आर पी वरील व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला .यासाठी जय शिवराय चे अध्यक्ष शिवाजी माने, आंदोलन अंकुशे धनाजी चुडमुंगे, बळीराजाचे बी जी पाटील तसेच कुलकर्णी काका, गब्बर पाटील, विकास शेसवरे,भैरवनाथ मगदूम,प्रताप चव्हाण, श्रीकांत गावडे ,मोहनराव यादव, किरण पाटील आप्पा, बंडा पाटील यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.