राशिवडे बुद्रुक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराबाबतचे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिते (ता. करवीर) येथे आज रात्री भरून आलेला पाच ट्रक ऊस स्वाभिमानीच्या आंदोलकांनी अडवला. या वेळी ट्रकमालक व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली, तर राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या तीन ठिकाणची ऊसतोडही बंद पाडली. यामुळे स्वाभिमानीच्या आंदोलनाला आता ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत निर्णय झाल्या नंतर कारखाने सुरु होणार आहेत. त्या आधीच कारखाने सुरु केल्याने रात्री भरून आलेला पाच ट्रक ऊस स्वाभिमानीच्या आंदोलकांनी परीते(ता.करवीर ) येथे अडवला. प्रतिवर्षीप्रमाणे ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय आणि जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत होणारा निर्णय कारखान्यांनी मान्य केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याने ऊस तोड देऊ नये, असा नियमच काही वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घालण्यात आला आहे. जिल्ह्यातील लवकर सुरू असलेल्या साखर कारखान्यांना आंदोलकांनी ऊस अडवून इशारा दिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.