शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’साठी आज पासून गाव चावड्या बंद !

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

ऊसपुरवठा केलेल्या शेतकर्यांना शासन नियमानुसार एफआरपीची रक्कम १४ दिवसात देणे बंधनकारक असताना. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास असमर्थ असल्याचे सांगून एफआरपीची रक्कम दोन हप्त्यात देण्याचे धोरण स्वीकारले. तेव्हापासून अंकुश या संस्थेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत.

एफआरपीची रक्कम वेळेत न मिळाल्याने १५ टक्के व्याजाची रक्कम उसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी अंकुश या संस्थेने पुकारलेल्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिरोळ मध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे तहसील कार्यालयात विविध कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. बुधवारपासून गाव चावड्या बंद करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलक अंकुश ने दिली आहे.

मंगळवारी शिरोळ, दानोळी, टाकळी, यद्राव, घालवाड, कुटवाड, कानवाड, हेरवाड आदी गावात अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळण्यात आला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी आर आर सी अंतर्गत कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीमधील उर्वरित हप्ता देऊन कारवाईचा बडगा टाळला , परंतु शिरोळ तालुक्यात दोन साखर कारखान्यांनी वेळेत एफआरपीची रक्कम न दिल्यावरून या दोन्ही साखर कारखान्यांनी १५ टक्के व्याजाची रक्कम द्यावी. यासाठी तहसील कार्यालयासमोर अंकुश ने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून तालुका बंद ची हाक दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here