रुडकी: कारखान्याने दिलेले ऊस बिलाचे पैसे न मिळाल्याने भारतीय किसान युनीयनच्या कार्यकर्त्यांनी येथील एका बँकेसमोर निदर्शने केली.
भारतीय किसान युनीयनच्या हनीफ, सोनवीर चौधरी, लियाकत, गुड्डू, पंजक सैनी, समीम आदी कार्यकर्त्यांनी बँकेच्या गेटवर धरणे आंदोलन केले. तत्काळ बँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या अडचणींबद्दल कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
लिब्बरहेडी साखर कारखान्याने अदा केलेले ऊसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नसल्याचे उघडकीस आले. बँकेच्या व्यवस्थपकांनी सांगितले की, इकबालपूर साखर कारखान्याकडून आलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, लिब्बरहेडी साखर कारखान्याकडून अद्याप पूर्ण पैसे आलेले नाहीत. जेव्हा हे पैसे कारखान्याकडून जमा होतील, तेव्हा तत्काळ ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन बँकेच्या प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.