कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कारखान्याच्या ऊस लागवड दिनदर्शिकेचे प्रकाशन

सोलापूर : एकरी ऊस उत्पादन वाढण्यासाठी तसेच जमिनीतून दीर्घकाळ ऊस उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता महत्वाची आहे. जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चेअरमन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.

वाखरी येथे स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ऊस लागवड दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी परिचारक बोलत होते. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दाजी पाटील, शेती अधिकारी संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, सभासद व संचालक उपस्थित होते.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक’ पांडुरंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढविण्याकरिता, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व या तांत्रिक मार्गदर्शनाचा विस्तार करून सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कारखान्याच्या वतीने गेली पाच वर्ष प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवड दिनदर्शिकेचे वाटप घरोघरी जाऊन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here