कोल्हापूर : भोगावती सहकारी सहकारी साखर कारखान्यात यंदाच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या १ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कृष्णराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. संचालक कृष्णराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आगामी काळात कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील-देवाळेकर यांनी केले.
अध्यक्ष प्रा. पाटील म्हणाले की, कारखान्याने २५ दिवसात १ लाख ८२६९ टन उसाचे गाळप करून १ लाख १५३५० पोती साखर उत्पादित केली असून सरासरी साखर १०.६५उतारा टक्के आहे. गेल्या सहा वर्षात आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काटकसरीचा व पारदर्शक कारभार करून कारखाना सभासदांच्या मालकीचा राखण्यात यश मिळवले आहे. आगामी काळात आम्ही कारखान्याची आर्थिक घडी मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करू. कार्यक्रमाला उपाध्यक्ष राजाराम कवडे यांसह संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.