पांडुरंग कारखान्यात १० लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या १० लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी कारखान्याने नव्याने उभारलेल्या को-जनरशेनच्या ९.७ एम.डब्ल्यू. प्रकाल्पाच्या टर्बाईनचे उद्घाटन झाले. कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे आणि संचालक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, यंदा विस्तारीकरणामुळे प्रती दिन ८००० मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप करीत आहे. हंगामात कारखान्याचे १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. परंतु उद्दिष्टापेक्षाही जास्त गाळप केले आहे. हंगामात १३० दिवसांत ९,४४,२५० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.२३ टक्के साखर उतारा आहे. को-जनरेशनमधून ५.२७ कोटी युनिट वीज निर्माण केली आहे. आसावनी प्रकल्पामधूनही ७५ लाख बल्क लि. इतके उत्पादन झाले आहे.

यावेळी संचालक दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here