धाराशिव : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील सिद्धिविनायक ग्रीन टेक इंडस्ट्रीज कारखान्यामध्ये गुरूवारी चालु हंगामात उत्पादीत ४,००,००१ व्या पोत्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, प्रदेश चिटणीस किरण पाटील व जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक व भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थित होते. कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता १२५० मे. टन आहे.
पोती पूजन कार्यक्रमास प्रवीण पाठक, नेताजी पाटील, इंद्रजीत देवकते, प्रदीप शिंदे, अॅड. नितीन भोसले, बालाजी कोरे, देवा नायकल, गणेश कामटे तसेच कारखान्यातील अधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात सिध्दीविनायक परिवार सर्वच क्षेत्रामध्ये विश्वसनीय काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जात आहे. जिल्ह्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून २ ऊसगाळप कारखाने सुरळीतरीत्या सुरू आहेत. कारखान्याने चालू हंगामामध्ये २,८०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.