लातूर : मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) या कारखान्यामध्ये चालू गळीत हंगामात उत्पादित ५,६०,००१ व्या साखर पोत्याचे पूजन मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री, दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, वैशालीताई देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, आमदार धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. हा कारखाना तुळजापुर, धाराशिव, लोहारा, औसा व परिसरातील अन्य गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
कारखान्याने आजअखेर २,७८,९०० मे टन गाळप केले आहे. तर एकूण ४,२५,००० मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने २,६०० रुपये प्रती टन ऊस बिल दिले आहे. पोती पूजन कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबक भिसे, धनंजय देशमुख तुळजापूर येथील धीरज पाटील, धर्यशिल पाटील, मुकुंद डोंगरे, सुरेश डोंगरे लक्षमणराव मोरे, दिलीप माने, जी. जी. येवले, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, यशवंतराव पाटील, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक भीमराव मोरे, शाम भोसले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.