सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ६,११,१११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. व्हा. चेअरमन कैलास खुळे, उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, ८४ दिवसांत ६,०१,५८८ मे. टन उसाचे गाळप करुन सरासरी ११.०२ टक्के साखर उताऱ्याने ६, ११, १११ क्विं. पोती साखर उत्पादन केले आहे.
चेअरमन परिचारक यांनी सांगितले की, कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास चांगला दर देत आहे. प्रति दिन ८००० मे. टनापर्यंत ऊस गाळप करीत आहोत. शासनाने सिरप ते इथेनॉलवर बंदी आणल्यामुळे कारखान्याचे गाळप सुमारे १२०० ते १५०० मे. टनाने कमी होत आहे. तरीही सभासदांचे नुकसान होऊ नये म्हणून वेळेवर गाळप सुरू आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी आहोत. या हंगामात कारखान्याने १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेश परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे आदी उपस्थित होते.