सहकारमहर्षी कारखान्याच्या ९ लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे पूजन

सोलापूर : येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने एक नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ऊस गळीत हंगामात आजअखेर नऊ लाख ८६ हजार १०० मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने नऊ लाख ६० हजार ९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या नऊ लाख ७१ हजार १७१ व्या साखर पोत्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा बी- हेवीसह १०.७६ टक्के आहे. को-जन. वीजनिर्मिती प्रकल्पातून आजअखेर वीज सात कोटी ९७ लाख ४३ हजार ९१८ युनिट निर्माण झाली. त्यामधून चार कोटी ६६ लाख ८७ हजार ९२१ युनिट विक्री केलेली आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.

संचालक संग्रामसिंह जहागीरदार यांच्या हस्ते कारखान्याच्या ३३ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून आतापर्यंत विक्री केलेल्या चार कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ वीज विक्री युनिटचे पूजन करण्यात आले. मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे राजेंद्र चौगुले यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागीरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षीरसागर, भीमराव काळे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here