नेपाळगंज : नेपाळमध्ये साखरेचा तुटवडा आणि किमतीमध्ये वाढ यामुळे साठेबाजी सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळ पोलिसांनी नेपाळगंज उपनगर शहर १ मधून मोठ्या प्रमाणात डाळ आणि साखर जप्त केली आहे. नेपाळगंज उपमहानगर १ जवळील नंदनी साखर कारखान्याच्या परिसरातून ५२० पोती साखर आणि ५१ पोती डाळ जप्त करण्यात आली. ५२० पोती साखरेची किंमत अंदाजे १८ लाख रुपयांहून (नेपाळी चलन) अधिक आहे. आणि ५१ पोती डाळीची किंमत १,०७,००० रुपये आहे. नंदनी साखर कारखान्यात वस्तूंची तस्करी करण्यात आली होती. लुंबिनी विभाग पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या एका पथकाने कारखान्यावर छापा टाकला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर आणि डाळीची तस्करी करण्यात आली होती. आणि या वस्तू कोणत्याही कागदपत्राविना कारखान्याच्या परिसरात ठेवण्यात आली होती. जप्त केलेल्या मालाची तपासणी करण्यासाठी हा माल नेपाळगंज कस्टम कार्यालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांकडून नियमित तपासणी सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात तस्करी केलेले साहित्य जप्त केले जात आहे. त्यामुळे नेपाळ पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, नंदनी मिल्सच्या संचालकांनी पोलिसांना सांगितले की, हा माल त्यांचा नसून इतर कोणाचा तरी आहे. पोलिसांनी हा माल बेवारस असल्याचे जाहीर केले आहे. कारण, या मालाचा मालक सापडलेला नाही.