पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला होता. त्यामुळे भीमा नदी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहू लागल्याने भीमा नदीने महापुराचे स्वरूप धारण केले होते. या भीमा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस पिके भुईसपाट झाली आहेत. गुरुवारी (दि.२५) हे पाणी नदीकाठच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
‘प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पारगाव येथील पंडितराव ताकवणे यांच्या शेतातील उभा ऊस व लागवड केलेला ऊस असा एकूण १४ एकर उसाचे नुकसान झाले आहे. सुहास व स्वप्नील ताकवणे यांचा ५ एकर ऊस तसेच केशव ताकवणे, शरद ताकवणे, दत्तात्रय बांदल आदी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
पुराबद्दल अधिक बातम्या वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचणे सुरू ठेवा.