पुणे : भीमा पाटस कारखान्याकडून सहा लाख ८५ हजार टन उसाचे गाळप

पुणे : यावर्षी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याने सहा लाख ८५ हजार ४४२ टन उसाचे गाळप करून सहा लाख ५३ हजार ५०० पोती साखर उत्पादित केली. ११.६९ इतका साखरेचा उतारा मिळाला आहे. येत्या मार्चअखेर उर्वरित उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या नावे जमा केले जाणार असल्याची माहिती संचालक विकास शेलार यांनी दिली.

संचालक तुकाराम ताकवणे यांच्या वतीने भीमा पाटस कारखान्यासाठी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर चालकांचा चालकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी शेलार बोलत होते. कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे व पारगाव गट ऑफिसचे कर्मचारी यांच्या वतीने या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राहुल टुले, मच्छिंद्र ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रामदास ताकवणे, मधुकर ताकवणे, चंद्रकांत ताकवणे, श्यामराव ताकवणे, दत्तात्रेय शेलार, अनिल ताकवणे, रवींद्र ताकवणे, जालिंदर ताकवणे, संतोष बोत्रे, अनिल थोरात आदी उपस्थित होते. दत्तात्रेय पवार, निवृत्ती ताकवणे, अनिल खळदकर, अशोक शेलार, विकास जेधे, ज्ञानदेव गायकवाड, प्रतीक निंबाळकर, युवराज सोलनकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here