पुणे : इंदापूर येथील भवानीनगरातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील उसाचा १५० रुपये प्रतीटनानुसार दुसरा हप्ता सभासदांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही माहिती दिली.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामामध्ये छत्रपती कारखान्याने एकूण ८ लाख ९५ हजार टन उसाचे गाळप केले. त्यातून ९ लाख ४९ हजार ५९५ क्विंटल साखर निर्मिती झाली. सरासरी १०.६१ टक्के साखर उतारा मिळाला. शेतकऱ्यांना प्रतीटन २४६२.४४ रुपये एफआरपी होती. कारखान्याने यापूर्वी २३५० रुपयांचा पहिला हप्ता सभासदांना दिला होता.
अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, आता प्रती टन १६० रुपये दुसरा हप्ता जाहीर केला आहे. यापैकी १० रुपये प्रती टन भागविकास निधी कपात केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर १५० रुपये प्रती टनानुसार १३ कोटी ४८ लाख रुपये जमा केले आहे.