पुणे : ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरित मुलांचे आगळे वेगळे स्नेहसंमेलन सोमेश्वर कारखान्यावर पार पडले. सोमेश्वरच्या कोपीवरची शाळा प्रकल्पातील मुलांनी नृत्य, नाटक, शाहिरी कला सादर करत सर्वांची मने जिंकली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या कोपीवरची शाळा उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक सुनील भगत, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी सतीश काकडे, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, अॅड. नवनाथ भोसले, गीतांजली बालगुडे उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक संतोष शेंडकर यांनी केले. संभाजी खोमणे, संतोष होनमाने, नवनाथ मेमाणे, आरती गवळी, अश्विनी लोखंडे, शुभम गावडे, अनिता ओव्हाळ, विकास देवडे, अक्षय इथापे, अस्मिता कांबळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन बाबुलाल पडवळ यांनी केले.