पुणे: कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

पुणे : वाढत्या कोरोनाचे रुग्ण पाहता राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांविरोधात गुरुवारी व्यापाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी कोविड १९च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात किमान ५० व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

व्यापारी संघटनांनी काल राज्य सरकारने लावलेल्या नियमांविरोधात पुण्यात लक्ष्मी रोडवर निदर्शने केली. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी करत आणि जर अधिकृतरित्या मंजुरी दिली नाही तर राज्य सरकारचे निर्बंध डावलून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारच्या पुढच्या आदेशापर्यंत रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणि आठवड्याच्या अखेरीस लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत सर्व दुकाने, आस्थापना, बाजार बंद करण्याचा आदेश दिला आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारी १२,०९० नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात ५६,२८६ नवे रुग्ण आढळले. तर ३६,१३० रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ३७६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here