पुणे : इंदापूर तालुक्यातील नीरा- भीमा सहकारी आणि विघ्नहर साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर माळेगाव या साखर कारखान्याच्या निवडणुकांही चांगल्याचं रंगणार आहेत. नीरा-भीमा कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी दि. १७ रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाच अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष लालासाहेब देविदास पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. कारखान्यावर स्थापनेपासून हर्षवर्धन पाटील यांची एकहाती सत्ता आहे.
दरम्यान, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननीत ६२ उमेदवारांचे अर्ज वैध व चार अर्ज अवैध ठरले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. उमेदवारी अर्ज माघारीसाठी ४ मार्चपर्यंत मुदत आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी निवडणूक रिंगणात ६० उमेदवार राहिले आहेत. ५ मार्च रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. तर शनिवारी (ता. १५) सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत मतदान होईल. रविवारी (ता. १६) रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.