पुणे : रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागाच्या लोणी टर्मिनल हा इथेनॉल वाहतूक करणारा देशातील पहिला टर्मिनल बनला आहे. येथून दहा ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील कडपा येथे बीटीपीएन (बोगी टँक पेट्रोल नाफ्ता) रेकमधून इथेनॉल पाठविण्यात आले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर काही राज्यांमध्येच साखर उत्पादन क्षेत्र केंद्रीत आहे. त्यामुळे भारतात इथेनॉलचे उत्पादन ठराविक प्रदेशातच होते.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पुणे विभागीतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्यांदाच इथेनॉलची वाहतूक रेकमधून करण्यात आली. सद्यस्थितीत साखर उद्योगासाठी अतिरिक्त उत्पादन आणि साखरेची कमी मागणी लक्षात घेऊन इथेनॉल निर्मिती हे वरदान बनले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभाग आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे १५ वॅगन इथेनॉल पाठविणे हे एक प्रगतीचे नवे पाऊल ठरले आहे. रेल्वे वाहतूक ही हरित इंधन वाहन क्षेत्राचा हिस्सा बनली आहे. ही एक नवी संधी रेल्वेला मिळाली आहे असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link