पुणे : शेतकऱ्यांची दिवाळी गोड, भीमाशंकर साखर कारखान्याकडून २५० रुपयांचा हप्ता जमा

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसाला प्रती टन ३२०० रुपये अंतिम दर जाहीर केला होता. त्यातील उर्वरित प्रती टन २५० रुपये याप्रमाणे २७ कोटी ७३ लाख रुपये सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून व दीपावलीसाठी साखर वाटप सुरू करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक संचालक व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्त रक्कम वेळेत दिली आहे. याशिवाय वाढीव रक्कम २५० रुपये अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे. कारखान्याने गाळप केलेल्या एकूण १९ लाख नऊ हजार ४६८ टन उसासाठी एफआरपी २,७९० रुपये टन असतानाही २,९५० रुपये प्रती टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना यापूर्वीच अदा केली आहे. अंतिम दर ३,२०० रुपये जाहीर करून त्यानुसार उर्वरीत २५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here