पुणे : श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोमवारअखेर पंधरा उमेदवारांची माघार

पुणे : जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोमवारअखेर (ता. ३) एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज माघारीसाठी मंगळवार अखेरची (ता. ४) मुदत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारी (ता. ५) प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघाच्या जुन्नर गटातून शिवम घोलप, शिरोली बुद्रुक गटातून प्रमोद खांडगे व प्रवीण डेरे, ओतूर गटातून संजय शेटे, पिंपळवंडी गटातून बबन गुंजाळ, घोडेगाव गटातून मार्तंड टाव्हरे, दत्तात्रेय निघोट, नामदेव पोखरकर, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून विलास रावते. महिला राखीव मतदारसंघातून संगीता घोडके. इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून हेमंत कोल्हे, रमेश भुजबळ, भगवान घोलप. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात बाबाजी लोखंडे, शंकर साळवे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. विघ्नहर कारखान्याच्या २१ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होत असून, छाननीमध्ये ६२ अर्ज वैध, तर चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here