पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण ६ गटांतून (‘अ’ वर्ग) १९ हजार ५४९, तर ‘ब’ वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रातील गट, गटामधील गावे व मतदार पुढीलप्रमाणे : गट क्रमांक १ : माळेगाव (२९६५) गावे : माळेगाव बुद्रुक (१७६७), माळेगाव खुर्द (५८०), येळेगाव (१९४), पाहुणेवाडी (१४०), ढाकाळे (२८४). गट क्रमांक २ पणदरे (३७९६) गावे पणदरे (२२८६), मानाप्पाचीवाडी (२७८), पवईमाळ (२१५), सोनकसवाडी (३५१), कुरणेवाडी (१४९), धुमाळवाडी (२८८), खामगळवाडी (२२९). गट क्रमांक ३ : सांगवी (२४८७) गावे: सांगवी (१३३६), कांबळेश्वर (७००), शिरने (२८२), पांढरेवाडी (११९), पिंगळेवाडी (५०). गट क्रमांक ४ : खांडज-शिरवली (२३७९) गावे : खांडज (१४७७), शिरवली (९०२). गट क्रमांक ५: निरावागज (३५०६) -गावे निरावागज (१८५३), मेखळी (१२७३), सोनगाव (२४१), घाडगेवाडी (१३९). गट क्रमांक ६ : बारामती (४४१६) गावे बारामती (७०३), मळद (६९१), मेडद (६०५), गुणवडी (४४७), डोरलेवाडी (२३३), राजाळे-सांगवी (१), वीरपुरी-दहिगाव (१), कहऱ्हावागज (५६१), नेपतवळण (२८८), बऱ्हाणपूर (१२०), उंडवडी सुपे (१८२), उंडवडी क. प. (१४७), जराडवाडी (२८६), सोनवडी (१५१).