पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांनी केले. कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री संजय भेगडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी जमिनी विकून सिमेंटचे जंगल उभे करण्यापेक्षा शेती टिकवावी. शेती टिकली तरच शेतकरी टिकेल. कारखान्याने कमीत कमी खर्चात, विक्रमी अनेक कामे मार्गी लावली. वेळेत कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारला. कारखान्याकडे २८ हजार लिटर इथेनॉल उपलब्ध असून तीन लाख ४१ हजार लिटर स्पिरीट तयार केले आहे.
कार्यक्रमात शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, ह.भ.प. माऊली कदम, ह.भ.प. चंद्रकांत वांजळे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री संजय भेगडे, माजी आमदार विलास लांडे, रूपलेखा ढोरे, सविता दगडे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, रवींद्र कंधारे, बाबूराव वायकर, राजाभाऊ हगवणे, बाळासाहेब चांदेरे, आत्माराम कलाटे, स्वाती ढमाले, प्रकाश भेगडे, अमोल बुचडे, पृथ्वीराज मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. विलास लांडे, हभप माऊली कदम, हभप. वांजळे यांनी इथेनॉल प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असे सांगितले. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीची माहिती दिली. संचालक तुकाराम विनोदे, दिलीप दगडे, चेतन भुजबळ, बाळकृष्ण कोळेकर, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, अंकुश उभे, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, महादेव दुडे, शामराव राक्षे, दिनेश मोहिते, ज्ञानेश नवले आदी उपस्थित होते.