पुणे : माळेगाव कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १४ ते १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केले. कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. २४) अध्यक्ष केशवराव जगताप व पत्नी शांताबाई जगताप यांच्या हस्ते पूजन करून मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. शासनाच्या निर्देशानुसार कारखाने १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. केंद्राने उसाचा रिकव्हारी बेस १०.२५ पकडून एफआरपीमध्ये ३,१५० रुपयांवरून ३,४०० रुपये प्रती टन वाढ केली आहे. मात्र साखर विक्रीचा दर तसाच आहे. हा दर ४० रुपये करण्याची विनंती राज्य सरकार, साखर संघ, नॅशनल फेडरेशनने केंद्र शासनाला केलेली आहे. दर वाढला, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील, असे जगताप यांनी सांगितले.
अध्यक्ष जगताप यांनी सांगितले की, हंगामाची पूर्वतयारी सुरू असून, तोडणी तसेच वाहतूकदारांचे करार झाले आहेत. सभासदांच्या आडसाली उसाचे गाळप प्राधान्याने केले जाईल. मागील हंगामात उसाला राज्यात उच्चांकी ३,६३६ रुपये प्रती टन दर दिला. कामगारांनादेखील २५ टक्के बोनस दिला आहे. अधिकाधिक ऊस गाळप व्हावा अशी अपेक्षा आहे. उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, तानाजीकाका कोकरे, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप, नितीन सातव, राजेंद्र ढवाण पाटील, अनिल तावरे, जी. बी. गावडे, स्वप्निल जगताप, मंगेश जगताप, संजय काटे, प्रताप आटोळे, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, दत्तात्रय येळे, निशिकांत निकम, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, विलास कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह सभासद, अधिकारी, कामगार या वेळी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.