पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याला राज्याच्या मध्य विभागातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तर्फे हा पुरस्कार गुरुवारी (दि. २३) माळेगाव साखर कारखान्याला देण्यात आला. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये एकूण उत्पादन प्रक्रिया खर्च हा राज्याच्या सरासरी साखरेच्या एकूण उत्पादन प्रक्रिया खचपिक्षा कमी ठेवत उत्कृष्ट नफा निर्देशांक राखला आहे. कारखान्यातील साखरेची प्रतिक्विटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च हा राज्याच्या सरासरी प्रतिक्विटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खचपिक्षा कमी आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘व्हीएसआय’ने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माळेगाव कारखान्याला दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते आदींनी पुरस्कार स्वीकारला.