पुणे : एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी सभासदांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. सभासदांच्या आडसाली उसाला प्राधान्याने तोड देणार आहोत. पर्जन्यमान चांगले असल्याने ऊस उत्पादन वाढले आहे, त्यामुळे १४ ते १५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणारे सुनीता व संजय जगताप, धीरज जगताप (पणदरे), उर्मिला व राजेंद्र जगताप (पणदरे), आशावी व जैनुद्दीन मुजावर (पणदरे), सुमन व सूर्यकांत बनकर, दिपाली सोलणकर, सिंधू व माधव बनकर (सोनकसवाडी), सुवर्णा व सोमनाथ नवले, वर्षा व रमेश शिर्के, मीनाक्षी व रोहिदास सांगळे, मंदाकिनी व रमेश गोफणे (माळेगाव), सुरेखा व पोपट तावरे (सांगवी), सारिका व अंबादास जगताप (मानाजीनगर), अरविंद जगताप (पवईमाळ), लक्ष्मण धायगुडे (निरावागज), पद्मिनी व सुरेश काळे (ऊस विकास अधिकारी) यांच्या हस्ते गाळप हंगाम प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजीकाका कोकरे, मदननाना देवकाते, सुरेश खलाटे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, नितीन सातव, अनिल तावरे, मंगेश जगताप, प्रताप आटोळे, संजय काटे, बन्सीलाल आटोळे, संगीता कोकरे, पंकज भोसले, तानाजी पोंकुले, दत्तात्रय येळे, निशिकांत निकम, विलास कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.