पुणे : नॅचरल शुगरचा ‘व्हीएसआय’ पुरस्कारात दबदबा : मिळवले तीन पुरस्कार

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) देण्यात येणाऱ्या पुरस्कारात तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगरने हॅट्ट्रिक साधली आहे. नॅचरल शुगरने तीन घवघवीत पुरस्कार मिळवत बाजी मारली आहे. यामध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट डिस्टिलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे पुरस्कार पटकावले. व्हीएसआयचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे, कारखान्याचे संचालक, अधिकारी यांनी स्वीकारले. नॅचरल शुगरला कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी हा एक लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्यात आला. उत्तर पूर्व विभागातून हंगाम २०२३-२४ मधील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार आणि राज्यात सर्वात कमी सरासरी साखरेचा उत्पादन खर्च राखल्याने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरणप्रसंगी संचालक पांडूरंग आवाड, बालाजी तट, संभाजी रेड्डी, किशोर डाळे, जनरल मॅनेजर यु. डी. दिवेकर, वर्कस मॅनेजर एस. व्ही. पाटील, फायनान्स मॅनेजर एस. व्ही. निगुट, ए. जी. शिंदे, कार्यालयीन अधिक्षक एस. ए. साळुंके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here