पुणे: विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे (IRTS) यांच्या नेतृत्वाखाली, पुणे रेल्वे विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालवाहतूक महसूलाचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पार केले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५०६.८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि विभागाने ३.४% च्या प्रभावी वाढीसह ते उद्दिष्ट पार केले आहे. ज्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच आतापर्यंत एकूण महसूल ५२४.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पुणे विभागाने साखर वाहतुकीत लक्षणीय वाढ पाहिली आहे. ज्यामुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी (२०२३-२४) ३३५ रॅक पाठवण्यात आले होते आणि त्यातून २३१.५६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू वर्षी (२०२४-२५) ४४२ रॅक लोड करण्यात आले होते. त्यातून ३०६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
पुणे विभागाने गुळ वाहतुकीतूनही मोठा महसूल प्राप्त केला आहे. मिरज, श्रीगोंदा, बेलापूर आणि कराड येथून गुळ दक्षिण भारतातील विविध ठिकाणी (मनमदुराई जंक्शन, चिपुरुपल्ले, तिरुचिरापल्ली, नेल्लैकुप्पम) नेला केला जात आहे. आतापर्यंत २४ रॅक गुळ वाहतूक करण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे आणि संपूर्ण पुणे विभागीय टीमच्या समर्पण आणि धोरणात्मक नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे, असे पुणे विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. पुणे विभाग ही गती कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.