पुणे – माळेगाव कारखान्याचा दुसरा हप्ता ३३२ रुपये : अध्यक्ष केशवराव जगताप

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दुसरा हप्ता ३३२ रुपये जाहीर केला आहे. यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यानी पहिली उचल ही प्रति टन २८०० रुपये जाहीर केली होती. दरम्यान, माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर होणार असल्याने त्यापूर्वीच दुसरा हप्ता दिल्याने सभासदांना निवडणूक गोड केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला दुसरा हप्ता ३३२ रुपये प्रति टन देण्याचे जाहीर केले आहे. ही रक्कम २० मार्चपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी दिली. दरम्यान, कारखाना

प्रशासनाने अगोदर पहिला हप्ता २८०० रुपये प्रति टन दिले असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सभासदांना एकूण ३१३२ रुपये प्रतिटन मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथमच दुसरा हप्ता जाहीर केल्याने दर देण्याबाबतीत आघाडी घेतली आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल ही २८०० रुपये दिली होती. त्यात माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर कारखान्यांनी पहिली उचलीची री ओढली होती. या पहिल्या उचलीत सभासदांचे पीक कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. मात्र, माळेगावचा निर्णय जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दिलासा देणारा ठरला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या:

पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत १७ जागा बिनविरोध, चार जागांसाठी होणार लढत

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here