पुणे : उसाला प्रती टन ३३०० रुपये दरासाठी रयत शेतकरी संघटनेचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर आंदोलन

पुणे : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव मिळावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या रोखून धरल्या. त्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना घेराव घालण्यात आला. अष्टापुर फाटा (ता. हवेली) येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, हेमंत चौधरी, बबनराव गायकवाड, अंकुश हंबीर, पुरुषोत्तम हंबीर, सरपंच एस. एस. तळेकर, सुशील शिंदे, किरण वडघुले, महादेव हंबीर, माधुरी वडघुले, सोनाली खेत्रे, अनिकेत खेत्रे, श्रीहरी कोतवाल, मीरा मांढरे आदी उपस्थित होते.

आंदोलनावेळी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले, ” कोल्हापूर तसेच बारामती तालुक्यातीलही काही साखर कारखाने नेहमीच दौंड तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा उच्चांकी बाजारभाव देतात. मात्र तालुक्यातील बहुतांश कारखाना नाला फक्त २६०० रुपये बाजारभाव देत आहे. त्यातही अनेक कारखाने वजनाला काटे मारून शेतकऱ्याची फसवणूक करतात. दौंड तालुक्यातील कारखानदार एकमेकांना पुढे करत संगनमताने एकजूट करत दरवर्षी उसाचे बाजारभाव जाहीर करतात. सर्व शेतकऱ्यांनी बाजारभावाबाबत एकत्र येणे काळाची गरज आहे. तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले की, शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही उसाला बाजारभाव देत आहोत. सध्या साखरेचे बाजारभावदेखील उतरले आहेत. साखर आयुक्तांच्या नियमाप्रमाणे आम्ही पहिला हप्ता २६०० रुपये दिला आहे. पुढील हप्ते एफआरपीनुसार दिले जातील.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here