पुणे : शेतकरी कृती समितीकडून सोमेश्वर कारखाना प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात पहिली उचल जाहीर केली नसल्याने शेतकरी कृती समिती व सभासदांच्या वतीने कारखान्याला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गाळप हंगाम २०२४-२५ची पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये व्याजासह तत्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप पूर्णपणे बंद करावे व सभासदांच्या उसाला प्राधान्य द्यावे, कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस घ्यायचा नाही, असा ठराव झाला असताना गेटकेन ऊस गाळपास कसा येतो? एक आठवड्याच्या आत बाहेरील सर्व टोळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणाव्यात, गेटकेन ऊस कारखान्याची तोडणी व वाहतूक यंत्रणा आणत नसेल, तरीही गेटकेन ऊस घेऊ नये, गेटकेनचा ऊस आल्याने सभासदांच्या ऊसतोडी लांबत चालल्या आहेत व वाहनतळावर वाहने खाली होण्यास उशीर होत असल्याने ऊस वाळून नुकसान होत आहे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here