पुणे : ऊसतोड वेळेत करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने घेतला अनोखा निर्णय

पुणे : सोमेश्वर कारखान्याचे चार तालुक्यात कार्यक्षेत्र असून सतत ऊस क्षेत्रात वाढ होत चालली आहे.शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे वाढलेला कल, उसाच्या एफआरपीची हमी आणि सोमेश्वरची विश्वासार्हता त्यामुळे सोमेश्वर स्वयंपूर्ण झाला. कारखान्याची गाळप साडेसात हजार टन प्रतिदिन झाली आहे. तरीही गाळप संपायला किमान पाच ते सहा महिने जात आहेत. महत्त्वाची समस्या म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा आडसाली ऊस लागवडीवरच भर असतो. त्यामुळे कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी खास चर्चासत्र घेऊन ऊस लागवड हंगामाचा शुभारंभ १५ जूनऐवजडी १ जुलै करण्याचा निर्णय घेतला.

सोमेश्वर कारखान्याने आडसाली ऊस लागवडीवर नियंत्रण कसे आणावे आणि खोडवा उसात वाढ कशी करावी, अशा विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास धोरणे अधिक पारदर्शी ठरणार हे लक्षात घेऊन कारखान्याने प्रयत्न केले. २००६ पूर्वी कारखाना गेटकेनवर अवलंबून होता. मात्र २००७ नंतर चित्र बदलले. आता ऊस वाढल्याने त्यातही आडसालीकडे कल वाढल्याने गेले अनेक हंगामात आडसाली ऊस फेब्रुवारी ते मार्चपर्यंत तोडला जातोय. उरलेल्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे तोडणीवेळी वय २० महिन्यांपेक्षा जादा होवून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. या पार्श्वभूमीवर आडसालीच्या धोरणाबाबत चर्चासत्र घेण्यात आले. खोडवा उसाच्या लागवडीला प्राधान्य देणे शेतकरी आणि कारखान्याच्याही हिताचे आहे तसेच गेटकेन ऊस आगामी हंगामात किती आणावा याबाबतही शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here