पुणे : घोडगंगा कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांची ससेहोलपट

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सलग दुसऱ्या वर्षीही सुरू झाला नाही. यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांची ऊस गळिताला घालण्यासाठी ससेहोलपट सुरू झाली आहे. शिरूर तालुक्यात सुमारे ३५ लाख टनाच्या आसपास उस उपलब्ध आहे.

घोडगंगा साखर कारखाना अस्तित्वात नव्हता तेव्हा ऊस गळिताला घालवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागायची, दरम्यान, सुमारे पंचवीस-सव्वीस वर्षापूर्वी तालुक्यातील न्हावरे येथे घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू झाला व शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न सुटला, मात्र दोन वर्षांपासून घोडगंगा साखर कारखाना अचानक बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरु झाली आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू असता तर अशी वेळ आमच्यावर आली नसती, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या परिसरामध्ये ऊस तोडणारे कामगार तसेच हार्वेस्टर देखील कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवसभर शेतकऱ्याला ऊसतोड मुकादमाच्या किंवा हार्वेस्टर मालका मागे फिरावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here