पुणे : मावळ तालुक्यात प्रथमच कृत्रिम बु्द्धीमत्तेच्या मदतीने ऊस लागवडीबाबत प्रयोग राबविण्यात आला आहे. मळवंडी ठुले येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ऊस शेतीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे एआय तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव यांच्या हस्ते प्रकल्पास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
पुणे जिल्ह्यात काही महिन्यांपासून एआयद्वारे ऊस शेतीचा प्रयोग सुरू आहे. त्याचा चांगला परिणामही दिसू लागले आहेत. प्रगतिशील शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या बारमाही उत्पादन असलेल्या दोन एकर ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाची उभारणी पूर्ण केली आहे. त्याची सुरूवात आता करण्यात आली. यावेळी संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, कारखान्याचे अन्य संचालक व पवनानगर भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.