पुणे : विघ्नहर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, २२ हजार सभासदांची यादी प्रसिद्ध

पुणे : जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. साखर कारखान्याच्या २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीवरील आक्षेप, हरकती प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयात १७ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यावर २७ पर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.

श्री विघ्नहर साखर कारखान्याचे जुन्नर व आंबेगाव हे दोन तालुके कार्यक्षेत्र आहेत. दोन्ही तालुक्यातील पाच मतदारसंघांतील २०९ गावांतील २२ हजार ३२५ सभासदांची यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व तहसीलदार कार्यालय, जुन्नर यांच्या सूचना फलकावर पाहण्यासाठी व तपासणीसाठी उपलब्ध आहेत. यादीनुसार, जुन्नर, शिरोली बुद्रुक, ओतूर, पिंपळवंडी, घोडेगाव या मतदारसंघात हे मतदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here