पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखाना येथे गेली ६७ दिवस निवृत्त कामगारांचे आक्रोश आंदोलन सुरु आहे. आंदोलनास कायदेशीर मदत करणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी कारखाना स्थळावर जाहीर केले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले कि, कामगारांच्या श्रमाची किंमत नसणारे कारखान्याचे अध्यक्ष कामगारांचे हाल करीत आहेत. याबाबत रितसर मार्गान न्यायालयीन लढा उभारुन सेवा निवृत्त कामगार यांना न्याय मिळवून देईन.
भीमा पाटस साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी दि. २ ऑक्टोबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा ६८ वा दिवस आहे. यावेळी कोळसे पाटील यांनी निवृत कामगारांशी सविस्तर चर्चा केली. कोळसे पाटील म्हणाले, कामगारांच्या मागण्या मान्य करणे रितसर असतानाही ते देण्याचे टाळणे बेकायदेशीर आहे. यासाठी सर्व ते न्यायालयीन केसेस मी विनामूल्य लढवणार आहे. कामगारांनी आता मागे हटता कामा नये. माजी आमदार रमेश थोरात म्हणाले, भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष देणी देणे रास्त असतानाही देत नाहीत. कामगारांच्या लढ्यात सर्व ते सहकार्य सातत्याने करीन. यावेळी हनुमंत वाबळे, बाळासाहेब कापरे, आशाबाई जाबले. कामगार नेते शिवाजी काळे. संतोष जाधव, नीरज धुमाळ उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.