पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या शनिवारी (दि.९ मार्च) मतदान होत आहे. त्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एकूण सात केंद्रांवरील ४२ मतदान केंद्रांवर मतदानास मान्यता दिली असल्याची माहिती सहकार उपनिबंधक आणि कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी शीतल पाटील यांनी दिली. २१ जागांसाठी एकूण ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यशवंत सहकारी साान्याची २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक होत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी ७ केंद्रे आणि त्यामधील एकूण ४२ मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. ९ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे.
मतदार यादीनुसा निवडणुकीसाठी २१ हजार १९ सभासद आहेत. तर उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी (दि.१०) सकाळी ९ पासून मतमोजणीस सुरुवात होईल. सर्वसाधारण गटाच्या १५ जागांसाठ ३८ उमेदवार रिंगणात आहेत. तर उत्पादक सहकारी संस्था, बिग उत्पादक संस्था व पणन संस्थ गटाच्या एका जागेसाठी २ उमेदवा आहेत. महिला राखीव गटाच्य २ जागांसाठी ४, अनुसूचित जाती / जमातीच्या एक संचालकांसाठी ३, इतर मागास वर्गाच्या एका जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.