पंजाब: ऊस थकबाकीप्रश्नी २० ऑगस्टला आंदोलनाची घोषणा

जालंधर : साखर कारखान्यांनी ऊसाचे पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात रेल्वे आणि रस्ते अडवले जातील. भारतीय किसान युनियन (बिकेयू) दोआबा आणि दोआबा शेतकरी संघर्ष समितीचे नेते मंजित सिंह राय आणि गुरविंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. २० ऑगस्ट रोजी धनौली गावाजवळ रेल रोको आंदोलन होईल. राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात येईल. गेल्या गळीत हंगामातील १४५ कोटी रुपये आणि ५५ कोटी रुपयांसह खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडे २०० कोटी रुपये थकीत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील ऊसाच्या ३१० रुपये प्रती क्विंटल दराच्या तुलनेत हरियाणातील साखर कारखाने ४८ रुपये प्रती क्विंटल जादा दर देत आहेत. हरियाणाने ऊस दरात ८ रुपयांची वाढ केली आहे. तेथे शेतकऱ्यांना आता ३५० रुपये प्रती क्विंटल दर मिळेल. गुरमिंदर सिंह यांनी सांगितले की, पंजाब सरकारने ऊस दर ९० रुपये प्रती टन वाढविण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here